Thursday, 21 April 2016

दिव्य मराठी वर्तमानपत्रात आलेली बातमी

शाळेला संगणक भेट मिळाला

आज जि.प. शाळा साकरी येथे तालुक्याचे आमदार मा. संजयजी सावकारे व त्यांच्या पत्नी मा. रजनीजी सावकारे  यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शाळेला काँम्प्युटर भेट दिले. शाळेत काँप्यूटर घेऊन त्यांच्या पत्नी मा रजनीजी सावकारे स्वत: आल्या.तसेच इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या यांनीशाळेतील मुलांसाठी लुडो गेम , बुध्दिबळ, क्रिकेट सेट, व्हाॅलीबाॅल, छोटे बँट चेंडु ,गोष्टींची पुस्तके भेट दिली

Wednesday, 13 April 2016

कचर्‍याची होळी

आज जि प शाला साकरी येथे  पौर्णिमा राणे यांच्या कल्पनेतून ईको फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली . निशा पाटिल यांनी स्वच्छतेचे े महत्व सांगितले.
त्यासाठी सर्व केरकचरा व् कागद जमा करू न् क्रिडांगनावर जमा केला . लेकरे खुप आनंदाने कचरा जमा करीत होते ँ

होळीभोवती फेर धरुन् ही घोषवाक्य म्हटली 1-कचरयाची दुर्गंधी, आजाराला मिळते संधी
2 करा कचरयाची होळी , जाळु नका पोळी
3 वाचवा रे वाचवा ,
लाकुड वाचवा
4-वाचवा रे वाचवा,
गोवरया वाचवा
5- वाचवा रे वाचवा
झाडे वाचवा
6-कचरयाचा करु  र्हास
स्वच्छतेची  धरु कास
7-घाण जाळ्नारी होळी असावी, स्वच्छ ठेवनारी होळी असावी
8-माकड़ा माकड़ा हूप हूप
झाडे लावा खुप खुप
[6:13pm, 05/03/2015] Pournima Rane: उद्दिष्टे-1-पर्यावरण समतोल राखणे

2-रोगराइस प्रतिबंध करणे: 3-ईन्धनाचि बचत करणे
4-मुलानमधे स्वच्छतेचि आवड निर्माण करणे
5-ग्रामस्वछतेची सवय लावणे
6-अन्नाचि नासाडी टाळणे

माझा उपक्रम

एकदा गंमत झाली हा पाठ शिकवताना मनुलीने पिंपळाच्या पानावरुन जसे नदीची माहिती तशी मी मुलांना प्रत्यक्ष पान आणुन नदीची संकल्पना स्पष्ट केली मुले देखील पानाच्या मधल्या शिरेवर बोट ठेवुन म्हणत होते " पहा मॅम ही डोंगरातून आलेली नदी.नदी पुढेपुढे चाललीय. बाजुच्या शिरा म्हणजे छोटेछोटे ओहोळ, ओढे तिला येवून मिळतायत.खरंच मॅम गंमतच आहे खरंच गंमत आहे ".मुले परत परत पान हातात घेत होती व म्हणत होती

माझा उपक्रम

🌷आजचा माझा उपक्रम🌷
        सौ .पौर्णिमा राणे
जि. प. शाळा साकरी ता.भुसावळ
🌺समोरच्या व्यक्तीला खुणा करुन सांगा🌺
🌲तोंडाने अजिबात बोलायचे नाही.
🌲खुणा करुन सांगा
🌲खुणा करुन विचारा
यासाठी प्रश्नावली----
-
🌻भाजी खुप छान झाली आहे
🌻थांबा
🌻काय झाले?
🌻थंडी वाजत आहे
🌻तहान लागली आहे
🌻वर्ग छान आहे
🌻टिचर कशा आहात??
असे विविध कृतीयुक्त वाक्य दिलेत. वर्गात मुलांनी खुपच छान प्रतिसाद दिला व अशा रितीने आज न बोलता देखील खुप खुप मजा आली.
🌹या उपक्रमाची यशस्वीता--
🌻या उपक्रमामुळे सर्व मुलांमधील अभिनयाचे कौशल्य समजले.
🌻लाजरी मुले देखीलअभिनय करु लागली
🌻मुलांचे मनोरंजन झाले

ppt वापरुन मार्गदर्शन

जि. प.शाला साकरी येथे आज  स्वच्छ शौचालय कार्यक्रम घेतला त्यात स्वछता व् शौचालय याची माहिती P P T द्वारे दिली

कार्यानुभव--कागदकाम

वर्गात फुलपाखरे बनवन्याचे शिकवले तर 2री तील भाविनने फुलपाखरू बनवले  व् मधे कागद न वापरता त्याने टुथब्रुश वापरला. अतिशय सुंदर ऎसे फुलपाखरु त्याने बनवले .

परिसर भेट--बाजाराला भेट

जि प शाला साकरी येथील 2 रीच्या मुलांना संतुलित आहार यातील सर्व भाज्यांची ओळख होण्यासाठी आम्ही गावांत ज़ी मंडई भरते तेथे घेऊन गेलो
पालेभाज्या ची ओळख
फळभाज्यांची ओळख
मोड़ आलेले कडधान्य ओळख करूँ न  दिली

योगदिनानिमित्त घेतलेला कार्यक्रम