Monday, 4 July 2016

जि.प. शाळा साकरी विषयी माहिती

🌻शाळेचे नाव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव🌻

🚩शाळेबद्दल थोडक्यात - साकरी हे गांव तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात.

🚩शाळेची स्थापना - 
                २५|०८|१९०९
🚩EMISक्रमांक-
         ०३०३०१९०१
🚩शाळेचे ब्रीदवाक्य - शिक्षण हीच ज्ञानगंगा
🚩शाळेचे क्षेत्रफळ-१५३७५चौ. मी.
🚩क्रिडांगणाचे क्षेत्रफळ-९१३२
🚩शाळेचे माजी विद्यार्थी - व्यावसायिक, नोकरदार [खाजगी/सरकारी]

🚩शाळेत राबवले जाणारे उपक्रम -

👉१००% पट नोंदणी, ९५ % च्या वर उपस्थिती
👉सर्व शासकीय योजना
🎤🎧नाविण्यपूर्ण परिपाठ
🌹🎈🎊वर्ग सजावट
👉शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा
👉दप्तराविना शाळा
📝Every Day English Day
👉कचऱ्याची होळी
🌄क्षेत्रभेटी
🍵संतुलित आहार मार्गदर्शन
👉सहशालेय उपक्रम
📝चावडी वाचन प्रकल्प
📝दिनांक तो पाढा
🎂विद्यार्थी आमचे, वाढदिवस त्यांचे
👌स्वच्छता अभियान
📝एकच ध्यास करुया अभ्यास
💃लेक शिकवा अभियान
🏤माझी समृद्ध शाळा
🎭सांस्कृतिक कार्यक्रम 
💉आरोग्य तपासणी शिबीर
🌳झाडे लावा, झाडे जगवा
👉टाकाऊपासून टिकाऊ
👌स्वच्छतेची सवय अंगी बाणु या
🍁हात धुवा दिन
📝गणिती खेळ
👏गुडगुड्या बनवणे व खेळण
📝गणिती खेळातून गणिती कौशल्य विकास
👉फिरती बैठक व्यवस्था
👉विज्ञान प्रदर्शन
👉शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
👉प्रश्नमंजुषा
👉बुद्धिबळ स्पर्धा
🙎कन्यापूजन
🙎बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान
⚽विविध क्रीडा स्पर्धा
🖥  *डिजिटल लँग्वेज लॅब*

🎈*शाळेची प्रवेश प्रक्रिया*🎈

- शासकीय नियमानुसार

🚩शाळेची वार्षिक फी - मोफत शिक्षण
👗 मोफत गणवेश
📚मोफत पाठ्यपुस्तके
🚩खेळाचे मैदान - आहे
⚽⛹🎲🏏🎿

🚩शाळेबद्दल अजून काही -

१. मा. आमदार संजय सावकारे पालकमंत्री  असतांना यांचेकडून विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे या उपक्रमास वर्षभर भेटवस्तू मिळाल्या,  व आता परत या  उपक्रमास प्रारंभ
२. सांस्कृतिक कार्यक्रमांना जि. प. सदस्य यांनी आवर्जून भेट दिली,
३. विविध सहशालेय कार्यक्रमांना मान्यवर मंडळी उपस्थित असतात,
४. माध्यमिक शाळेसोबत मिळून प्रभातफेरी,
५. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन,
६. शालेय उपक्रमांमध्ये लोकसहभाग मोठ्या प्रमाणात असतो.
          🍁विशेष🍁
या वर्षापासून * semi English* वर्ग सुरु केला आहे.

🚩शाळेचा शिक्षक वृंद---

१. सौ. सुशिला लोटू फिरके - मुख्याध्यापिका
२. श्रीम. सुनिता सदाशिव कोळी - उपशिक्षक
३. सौ. पौर्णिमा नितीन राणे - उपशिक्षिका 
४. श्री. विनायक वसंत कोल्हे - उपशिक्षक
५. श्रीम. रुपाली दामोदर जावळे - उपशिक्षिका
६. श्रीम. निशा भास्कर पाटील - उपशिक्षिका
७. श्रीम. पूर्णिमा रमेश नेमाडे - उपशिक्षिका

=======================

🚩 आपल्या मराठी शाळा आपले वैभव, हे वैभव असेच टिकण्यासाठी मुलांना मराठी शाळेत शिकवा

🚩 मातृभाषेतून शिक्षण सर्वोत्तम शिक्षण

🌻 मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत 🌻

Saturday, 2 July 2016

Wednesday, 29 June 2016

*विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे*

🍁मा. आमदार संजयजी सावकारे यांच्या  संकल्पनेतील🎈   *विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे*हा उपक्रम २९ तारखेला ११ वाजता १४ मुला मुलीचे वाढदिवस साजरे करुन करण्यात आला. या 
🌷   *कार्यक्रमाचे अध्यक्ष*
*मा. श्री गोलूभाऊ पाटील*
उपसभापती पंचायत समिती भुसावळ हे होते.
🌷  *कार्यक्रमाचे उद् घाटक*   🌷   * *मा.  श्री. विजय पवार*
गटशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग भुसावळ  यांनी दिपप्रज्वलन करुन उद् घाटन केले.
🍁 त्यानंतर सर्व सत्कार मुर्ती वाढदिवस असणारे 14 विद्यार्थी समवेत🎂 केक कापण्यात आला.
🍁 त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कारमुर्ती मुले व मुली यांना 🎁भेटवस्तु व आमदार साहेबांचे 📄 शुभेच्छापत्र देण्यात आले.
🍁या प्रसंगी मा.विजय पवार साहेबांनी अनमोल मार्गदर्शन केले.
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
सर्व विद्यार्थ्यांना चाँकलेट 🍬🍬वाटप करण्यात आले
*या कार्यक्रमास सरपंच  मा. कांचन भोळे व उपसरपंच मा. सोपान भारंबे व  ग्रामपंचायत साकरी सदस्य मा.प्रदिप भारंबे, मा. छोटूभाऊ फालक, मा. उज्वला फेगडे, मा. निर्मला तायडे, मा. हेमंत फेगडे, मा. नारायणदादा कोळी, ग्रामसेवक मा. खैरणार दादा
व सर्व युवक मंडळ सदस्य साकरी व सर्व शिक्षक वृंद
*जि.प. शाळा साकरी*
ता. भुसावळ जि. जळगाव उपस्थित होते.
🍁 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Saturday, 25 June 2016

राजर्षि शाहू महाराज जयंती

🍁🌷🍁🌷🍁🌷🍁🌷🍁

🍁🌹    *जि. प. शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*   🌹🍁
👫  *सामाजिक न्याय्य दिन*  👫
🍁 शाळेत ७.३० वाजता सर्व शिक्षक व विद्यार्थी जमले.
🌷भा.ज.पा. तालुका सरचिटणीस मा. नारायण कोळी यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस फुलांचा हार घालून पूजन करण्यात आले.
🍁सर्व शिक्षकांनी राजर्षि शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
🍁इयत्ता 2री, 3री, व 4 थी च्या विद्यार्थ्यांनी शाहु महाराज व सामाजीक न्याय या विषयावर भाषणे केली.
🍁शिक्षिका पुर्णिमा नेमाडे यांनी सामाजीक न्याय याविषयी माहिती दिली.
🍁भा.ज.पा.तालूका सरचिटणीस मा. नारायण कोळी यांनी मुलांना मार्गदर्शन केले व मा. आमदार संजयजी सावकारे यांच्या संकल्पनेतील🎈   *विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे* 🎈हा उपक्रम परत जून महिन्यापासून राबवणार असल्याचे जाहीर केले.
🍁प्र. मुख्याध्यापिका पौर्णिमा राणे यांनी अध्यक्षीय भाषण केले.
🍁शिक्षिका निशा पाटील व रुपाली जावळे यांनी विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेतल्या.🍁
🍁शाळेतील शिक्षक श्री. विनायक कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.🍁
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🍁👫शब्दांकन👫🍁
🌷 *पौर्णिमा राणे*  🌷
*जि.प. शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*
🍁🎈🍁🎈🍁🎈🍁🎈🍁

*माझा उपक्रम*

🌷*माझा उपक्रम*🌷
🌳*पौर्णिमा राणे*🌳
*जि.प. शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*
🍁इयत्ता- ४थी🍁
🎈विषय- परिसर अभ्यास🎈
*कोंबडीच्या पिल्लाचा अंड्यातून जन्म*
🐓🐣🐓🐣🐓🐣🐓🐣
कोंबडी अंडी घालते हे सर्वांना नक्की माहीती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिल्लां ची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवतै.
वाढ पूर्ण झाली , की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहैर पडते.
*🍁उपक्रमाचे फायदे*🍁---
🐓कोंबडी अंडी घालते हे समजते.
अंडी उबवणे समजते
पिल्लू बाहेर कसे पडते हे प्रत्यक्ष दाखवल्यामुळै लवकर लक्षात येते व चिरकाल स्मरणात राहते.
*🌹मुलांचा प्रतिसाद*🌹
मुले जाम खुश होती व अंडे हाताळत होती.तसेच अंड्यातून पिल्लू बाहेर कसे पडले हे परत परत सांगत होती.
बनवलेले साहित्य मुलांनी चांगल्या प्रकारे हाताळले.
🍁*🍁उपक्रम सादरकर्ते🍁*🍁——
*पौर्णिमा राणे*
*जि.प.शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*