Wednesday, 29 June 2016

*विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे*

🍁मा. आमदार संजयजी सावकारे यांच्या  संकल्पनेतील🎈   *विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे*हा उपक्रम २९ तारखेला ११ वाजता १४ मुला मुलीचे वाढदिवस साजरे करुन करण्यात आला. या 
🌷   *कार्यक्रमाचे अध्यक्ष*
*मा. श्री गोलूभाऊ पाटील*
उपसभापती पंचायत समिती भुसावळ हे होते.
🌷  *कार्यक्रमाचे उद् घाटक*   🌷   * *मा.  श्री. विजय पवार*
गटशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग भुसावळ  यांनी दिपप्रज्वलन करुन उद् घाटन केले.
🍁 त्यानंतर सर्व सत्कार मुर्ती वाढदिवस असणारे 14 विद्यार्थी समवेत🎂 केक कापण्यात आला.
🍁 त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कारमुर्ती मुले व मुली यांना 🎁भेटवस्तु व आमदार साहेबांचे 📄 शुभेच्छापत्र देण्यात आले.
🍁या प्रसंगी मा.विजय पवार साहेबांनी अनमोल मार्गदर्शन केले.
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
सर्व विद्यार्थ्यांना चाँकलेट 🍬🍬वाटप करण्यात आले
*या कार्यक्रमास सरपंच  मा. कांचन भोळे व उपसरपंच मा. सोपान भारंबे व  ग्रामपंचायत साकरी सदस्य मा.प्रदिप भारंबे, मा. छोटूभाऊ फालक, मा. उज्वला फेगडे, मा. निर्मला तायडे, मा. हेमंत फेगडे, मा. नारायणदादा कोळी, ग्रामसेवक मा. खैरणार दादा
व सर्व युवक मंडळ सदस्य साकरी व सर्व शिक्षक वृंद
*जि.प. शाळा साकरी*
ता. भुसावळ जि. जळगाव उपस्थित होते.
🍁 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Saturday, 25 June 2016

राजर्षि शाहू महाराज जयंती

🍁🌷🍁🌷🍁🌷🍁🌷🍁

🍁🌹    *जि. प. शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*   🌹🍁
👫  *सामाजिक न्याय्य दिन*  👫
🍁 शाळेत ७.३० वाजता सर्व शिक्षक व विद्यार्थी जमले.
🌷भा.ज.पा. तालुका सरचिटणीस मा. नारायण कोळी यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस फुलांचा हार घालून पूजन करण्यात आले.
🍁सर्व शिक्षकांनी राजर्षि शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
🍁इयत्ता 2री, 3री, व 4 थी च्या विद्यार्थ्यांनी शाहु महाराज व सामाजीक न्याय या विषयावर भाषणे केली.
🍁शिक्षिका पुर्णिमा नेमाडे यांनी सामाजीक न्याय याविषयी माहिती दिली.
🍁भा.ज.पा.तालूका सरचिटणीस मा. नारायण कोळी यांनी मुलांना मार्गदर्शन केले व मा. आमदार संजयजी सावकारे यांच्या संकल्पनेतील🎈   *विद्यार्थी आमचे वाढदिवस त्यांचे* 🎈हा उपक्रम परत जून महिन्यापासून राबवणार असल्याचे जाहीर केले.
🍁प्र. मुख्याध्यापिका पौर्णिमा राणे यांनी अध्यक्षीय भाषण केले.
🍁शिक्षिका निशा पाटील व रुपाली जावळे यांनी विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेतल्या.🍁
🍁शाळेतील शिक्षक श्री. विनायक कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.🍁
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🍁👫शब्दांकन👫🍁
🌷 *पौर्णिमा राणे*  🌷
*जि.प. शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*
🍁🎈🍁🎈🍁🎈🍁🎈🍁

*माझा उपक्रम*

🌷*माझा उपक्रम*🌷
🌳*पौर्णिमा राणे*🌳
*जि.प. शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*
🍁इयत्ता- ४थी🍁
🎈विषय- परिसर अभ्यास🎈
*कोंबडीच्या पिल्लाचा अंड्यातून जन्म*
🐓🐣🐓🐣🐓🐣🐓🐣
कोंबडी अंडी घालते हे सर्वांना नक्की माहीती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिल्लां ची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवतै.
वाढ पूर्ण झाली , की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहैर पडते.
*🍁उपक्रमाचे फायदे*🍁---
🐓कोंबडी अंडी घालते हे समजते.
अंडी उबवणे समजते
पिल्लू बाहेर कसे पडते हे प्रत्यक्ष दाखवल्यामुळै लवकर लक्षात येते व चिरकाल स्मरणात राहते.
*🌹मुलांचा प्रतिसाद*🌹
मुले जाम खुश होती व अंडे हाताळत होती.तसेच अंड्यातून पिल्लू बाहेर कसे पडले हे परत परत सांगत होती.
बनवलेले साहित्य मुलांनी चांगल्या प्रकारे हाताळले.
🍁*🍁उपक्रम सादरकर्ते🍁*🍁——
*पौर्णिमा राणे*
*जि.प.शाळा साकरी ता. भुसावळ जि. जळगाव*

*पर्यावरण घोषवाक्ये*

*पर्यावरणावर आधारित घोषवाक्य*

पर्यावरणावर आधारित घोषवाक्य

पर्यावरण जागवा वसुंधरा वाचवा

व्रक्ष लावा दारोदारी आरोग्य येईल घरोघरी

दारी वृक्षाचा पाहारा, देऊ पक्षाला आसरा
दारी वृक्षाचा पाहारा, देऊ पक्षाला आसरा

तुला हवी असेल उभी रहायला सावली…
तर झाडे लाव पावलोपावली..

वृक्ष लावा, जिवन वाचवा

झाडेच झाडे लाऊया
फळे फुले वेचूया

नको वृक्षाशी कृतन्घ
राहू सदा कृतदज्ञ.

झाड म्हणतं या रे या
फळं, फुलं, सावली घ्या

एक एक कागद वाचवू. .
खूप खूप झाडे जगवू.

कावळा करतो कावकाव,
म्हणतो माणसा ,झाड लाव

झाडे लावू भारंभार,
शिवार होईल हिरवेगार

भाव तोची देव  जरी
प्रेम असावे तरू वरी.

सुंदर नक्षी, आकाशात पक्षी
मानव विकासास पर्यावरण साक्षी

पुढील पिढीसाठी ठेवू वारसा 
तरू वेली दाखवतील आरसा

सावली ,ऑक्सिजन, फुल ,फळ पान
वृक्षांचा ठेवू दिलो जान से मान.

काळ्या मातीत बीज पेरले
ओंजळ भर पाणी घातले
मातीच्या कुशीत बीज हासले
जो बाळा जो रे जो..

वसुंधरेचे हिरवे लेणे
लावा वने वाचवा वने

वसुंधरा आमची छान
राखू तीचा मान

*घोषवाक्ये*

1) गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र.
2) स्वच्छता आली अंगणात, समाज का अंधारात.
3) सुरक्षित साधन पाण्याचे , महत्व पटवा हातपंपाचे.
4) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार ,हे तर दूषित पाण्याचे प्रहार.
5) उघड्यावर शौचास बासु नका, रोगांना आमंत्रण देऊ नका.
6) पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन.
7) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू.
8) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुन लावा.
9) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.
10) नका बसु उघड्यावर संडासाला ,संधि मिळेल रोगाराई पसरण्याला.
11) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट.
12) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नका तुमच्या हाताने.
13) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामिण आरोग्याचा हाच कानमंत्र.
14) ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबता.
15) रंग भगवा त्यागाचा, मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.
16) पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
17) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, सर्व रोगराईना दूर पळवू .
18) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती.
19) ” स्वच्छता” माणसाचे आत्मदर्शन घडविते.
20) वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ति.
21) हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचाला बसलयं कोण.
22) जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा दात.
23) नखे कापा बोटाची  , नाही होणार व्याधि पोटाची.
24) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ सृष्टि.
25) संडास बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल त्याच्या दारी.
26) सांडपाण्याला आळा  , रोगाराई टाळा.
27) स्वच्छ सुंदर परिसर ,  जीवन निरोगी निरंतर.
28)  स्वच्छ शाळा करा हातांनी , सुंदर गाणी गाऊ मुखांनी.
29) स्वच्छ सुंदर परिसरातुच , सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.
30) गावकरी मिळुन एक काम करू, शौचालयाचा वापर करू.
31) शौचालय असेल जेथे , खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
32) संडास बांधण्या नाही म्हणू नये, शौचाला लोटा घेऊन जाऊ नये.
33) आधी केले मग सांगितले , आधी आपल्या घरी शौचालय बांधले.
34) स्वच्छ घर , सुंदर परिसर , शोचखड्याचा करुया वापर.
35) कचरा कुंडिचा वापर करू , सुंदर परिसर निर्माण करू

हवी असेल शुद्ध हवा ,
तर झाडे लावा ,झाडे जगवा.
🌳🍃🌾🌳🌱🌳🌿

Tuesday, 21 June 2016

प्रवेशोत्सव बातमी

आंतरराष्ट्रीय योगदिन २१जून

आज जि. प. साकरी येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त साकरी येथे पौर्णिमा राणे यांनी योगासने घेतली . सदर प्रसंगी सरपंच मा.कांचनताई भोळे ,  उपसरपंच मा. सोपान भारंबे , शा.व्य, स .उपाध्यक्ष मा.दिपक पाटील, सदस्या कविता पाटील ग्रामपंचायत सदस्या मा. निर्मला तायडे , भा.ज.पा. तालुका सरचिटणीस मा. नारायण कोळी तसेच शिक्षक विनायक कोल्हे, पौर्णिमा राणे, रुपाली जावळे, निशा पाटील,  पूर्णिमा नेमाडे उपस्थित होते.

Wednesday, 15 June 2016

*शाळा प्रवेशोत्सव*

🌷जि.प. शाळा साकरी येथील *शाळा प्रवेशोत्सव*🌷
📝शब्दांकन~पौर्णिमा राणे
🍁13-6- 2016
वर्गसफाई व आवारसफाई
🍁14-6-2016
आंब्याच्या पानांची शाळेत तोरणे लावून शाळा सजवली🎊.
रांगोळ्या काढण्यात आल्या.🏖
🍁15-6-2016
आज शाळेचा पहिला दिवस.
शाळेच्या परिसरात व 🏘गावात👭👫👬 शैक्षणिक दिंडी ढोलताशांच्या गजरात 🎷🎺निघाली. सर्व नवागत छान अशा सजवलेल्या🎈  फुगे व 🌹फुले लावलेल्या *प्रवेशोत्सव रथात* उभे राहिले व 🎺🎷वाजतगाजत या प्रवेशोत्सव रथासह सर्व विद्यार्थी , शिक्षक ,शा व्य. समिती सदस्य, सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावातून मिरवणूक काढण्यात आली . 🍁शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असल्याबाबत विद्यार्थी व पालकांना जाणीव करुन देण्यात आली.
🍁100%विद्यार्थी हजर राहावेत यासाठी घरोघरी जावून पालकभेटी घेण्यात आल्या. 🍁आदल्या दिवशी मुलांना गणवेश वाटप केल्याने विद्यार्थी गणवेशात उपस्थित होते .
🍁गावातील मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके📚 वाटप करण्यात आली.
🍁शा. पो.आ. अंतर्गत भोजनात शिरा वाटप करण्यात आला.
🍁 अशा रितीने आमच्या साकरी जि. प. शाळेत प्रवेशोत्सव आनंदाने साजरा केला गेला.🙏🙏
🍁📝शब्दांकन~पौर्णिमा राणे
जि. प. शाळा साकरी
ता. भुसावळ जि. जळगाव