🌷जि.प. शाळा साकरी येथील *शाळा प्रवेशोत्सव*🌷
📝शब्दांकन~पौर्णिमा राणे
🍁13-6- 2016
वर्गसफाई व आवारसफाई
🍁14-6-2016
आंब्याच्या पानांची शाळेत तोरणे लावून शाळा सजवली🎊.
रांगोळ्या काढण्यात आल्या.🏖
🍁15-6-2016
आज शाळेचा पहिला दिवस.
शाळेच्या परिसरात व 🏘गावात👭👫👬 शैक्षणिक दिंडी ढोलताशांच्या गजरात 🎷🎺निघाली. सर्व नवागत छान अशा सजवलेल्या🎈 फुगे व 🌹फुले लावलेल्या *प्रवेशोत्सव रथात* उभे राहिले व 🎺🎷वाजतगाजत या प्रवेशोत्सव रथासह सर्व विद्यार्थी , शिक्षक ,शा व्य. समिती सदस्य, सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावातून मिरवणूक काढण्यात आली . 🍁शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असल्याबाबत विद्यार्थी व पालकांना जाणीव करुन देण्यात आली.
🍁100%विद्यार्थी हजर राहावेत यासाठी घरोघरी जावून पालकभेटी घेण्यात आल्या. 🍁आदल्या दिवशी मुलांना गणवेश वाटप केल्याने विद्यार्थी गणवेशात उपस्थित होते .
🍁गावातील मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके📚 वाटप करण्यात आली.
🍁शा. पो.आ. अंतर्गत भोजनात शिरा वाटप करण्यात आला.
🍁 अशा रितीने आमच्या साकरी जि. प. शाळेत प्रवेशोत्सव आनंदाने साजरा केला गेला.🙏🙏
🍁📝शब्दांकन~पौर्णिमा राणे
जि. प. शाळा साकरी
ता. भुसावळ जि. जळगाव
Wednesday, 15 June 2016
*शाळा प्रवेशोत्सव*
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment